ABOUT AUTHOR

Home - About Author

Author description

From his childhood, he developed the hobbies of climbing trees, wandering and treking in the area of high peaks and the Valleys of Sahyadri, tours all over the India, drawing and painting, clay scluptering, acting, dancing and directing the performing arts.

He developed the hobbies of dancing and directing folk dance, cultural and social work and to attend kirtanas. He developed his writing skill and the literature became the part of his personality.

He writes in all forms of the literature that is, novel, short stories and stories, poems, articles, criticism, research books etc.

It was miraculous that he joined as a peon and the next day immediately he began to serve as a teacher. He completed his graduation and post graduation from the Pune University as external student upto 1975.

In between 1971-72 he got the chance to complete B.Ed. on depution. In this journey of life Shri Purushottam and Mrs. Pramila Takalkar, Mr. Ganesh and Mrs. Saraswati Somni, Anil's Honourable Guruvarya, Haribhau Phadke Sir and his cologue Mr. Bansishetji and Mrs. Ayodhya Mundada sheltered Anil.

Anil completed his Ph.D. on 'Chalisgaon Dangan Parisar : Cultural Literary and Linguestic Study' under the guidance Honorable Dr. Gangadhar Morje in 1979-80.

It was the field work and inter-displinary study based on folklore.

Anil Sahasrabuddhe worked as a teacher from July 1965 to 31st August 2007 that is fourty two years in Hind Seva Mandal, at the Secondary, Higher Secondary, Under-Graduate and Post-Graduate upto Ph.D. guide.

In this long period he taught Mathematics, Science, Hindi, English and Marathi. Twenty two years he was Professor in Marathi and worked as Research Guide and resours person.

He retired as HOD Marathi and Principal Pemraj Sarda College, Ahmednagar.

He delivered the tiffins, fetched the water from river Pravra to many families.

He worked as painter as well as delivered newspapers etc. While working hard, he was also cautious about his studies. This way, he passed out S.S.C. in 1964.

Being unable to join college, he completed Teacher's Diploma and he joined Hind Seva Mandal's Modern High School, Akole in 1965.

लेखक वर्णन

Biodata :

डॉ. अनिल सहस्रबुद्धे

(Click here to read Biodata)

अहमदनगर जिल्ह्यातील, अकोले या तालुक्याचे ठिकाण असूनही अतिशय छोट्याशा खेड्यात, एका गरीब, कोकणस्थ ब्राह्मण कुटुंबात श्री. अनिल यांचा जन्म सहस्रबुद्धे घराण्यात 24 ऑगस्ट 1947 अर्थात श्रावण शुक्ल अष्टमी शके 1869 मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्री. नागेश केशव सहस्रबुद्धे तर मातोश्रींचे नाव सौ. आनंदी नागेश सहस्रबुद्धे असे होते. श्री. नागेश व्हिलेज पोस्टमन म्हणून टपाल खात्यात नोकरीला होते. ते 1964 साली पोस्टमन म्हणून निवृत्त झाले. सौ. आनंदी या पूर्वाश्रमीच्या दुर्गा श्रीधर काणे होत्या, त्या गृहिणीपद सांभाळत होत्या. बालवयातच त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. विवाहानंतर अकोले गावातही त्यांचे सामाजिक कार्य सुरू होते. महिला मंडळ उभारणी, विडी कारखान्यात जाऊन प्रौढ शिक्षण वर्ग घेणे आणि वैद्यकीय ज्ञान असल्याने व विशेषतः लहान मुलांच्या दुखण्याबाण्याचे ज्ञान असल्याने गावात सर्व जातीजमातीच्या समाजात जाऊन वैद्यकीय सेवा त्या करीत असत. नागेश व आनंद यांना नलिनी, शशिकला, अशोक, अनिल, रमेश व विद्या तथा नंदा तीन मुली व तीन मुले अशी अपत्ये होती. आठ जणांचे कुटुंब, तुटपुंजी मिळकत त्यामुळे हलाखीच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आई व मुले काही ना काही काम करीत व कसेबसे भागवित. सौ. आनंदी ह्या जेवणाचे डबे करून देणे व घरीही जेवायला खानावळीप्रमाणे देण्याचे काम करीत असत. त्यांनी ‘काटे आणि गरे’ असे आत्मचरित्र लिहिले आहे. स्वतः श्री. अनिल यांनी जेवणाचे डबे पोचविणे, घागरीने नदीवरून पाणी वाहणे, घरांना चुन्याचा रंग देणे, वर्तमानपत्र टाकणे अशी कामे करीत 1964 मध्ये अकरावी एस.एस.सी.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयात जाऊन शिक्षण घेणे शक्य नव्हते; म्हणून त्यांनी श्रीरामपूर येथे राहून टीचर्स डिप्लोमा पूर्ण केला. वयाची अठरा वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच ते अकोले येथील, स्वतःचे शिक्षण पूर्ण केलेल्या शाळेत, अर्थात ‘हिंद सेवा मंडळ’ या शिक्षण संस्थेचे, अकोले तालुक्यातील पहिले हायस्कूल ‘मॉडर्न हायस्कूल’मध्ये प्रथम शिपाई व दुसर्‍याच दिवशीपासून शिक्षक म्हणून सेवा करू लागले. शिक्षक म्हणून काम करीतच त्यांनी पुणे विद्यापीठाच्या ‘एम.ए.’ पदवीपर्यंतचे शिक्षण बह्यस्थ विद्यार्थी 1975 पर्यंत पूर्ण केले. दरम्यान 1971-72 मध्ये त्यांना शासकीय योजनेनुसार डेप्युटेशनवर ‘बी.एड.’ करण्याची संधी मिळाली. या सर्व प्रवासात त्यांना पुरुषोत्तम टाकळकर व त्यांच्या सौ. प्रमिला टाकळकर, गणेश सोमणी व सौ. सरस्वती सोमणी, पू. गुरुवर्य हरिभाऊ फडके सर व त्यांचे सहकारी शिक्षक, श्री. बन्सीशेठजी मुंदडा व सौ. अयोध्या मुंदडा व प्रामुख्याने त्यांची भगिनी माई अर्थात शशिकला सहस्रबुद्धे अर्थात विवाहोत्तर सौ. मधुकांता गाडगीळ या सर्वांनी मोठ्या प्रेमाने परोपरीने सांभाळले. डॉ. गंगाधर मोरजे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘चाळीसगाव डांगाण परिसर ः सांस्कृतिक वाङ्मयीन व भाषिक अभ्यास’ या विषयावर अंतरज्ञानशाखीय स्वरूपात क्षेत्रीय अभ्यास करून पुणे विद्यापीठाची पीएच.डी. 1979-80 मध्ये त्यांनी संपादन केली. येथवरच्या प्रवासात 1972 साली कल्याण येथील श्री. विनायक महादेव नातू व सौ. शारदा विनायक नातू यांची कन्या शोभा हिच्याशी त्यांचा विवाह झाला. सौ. उषा अनिल सहस्रबुद्धे यांना सप्टेंबर 1973 मध्ये चि. स्वप्नील हा पुत्र व 1978 मध्ये कु. स्फूर्ति ही कन्या झाली.

अनिल सहस्रबुद्धे यांनी ‘हिंद सेवा मंडळ’ या शिक्षण संस्थेत 1965 जुलैपासून 31 ऑगस्ट 2007 पर्यंत तब्बल बेचाळीस वर्षे माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन, पदव्युत्तर अशा स्तरांवर अध्यापन केले. या कालावधीत गणित, शास्त्र, हिंदी, इंग्रजी व मराठी या विषयांचे त्यांनी अध्यापन केले. बावीस वर्षे त्यांनी मराठीचे प्राध्यापक, संशोधन मार्गदर्शक, उद्बोधक, मराठी विभाग प्रमुख म्हणून सेवा केली. अखेरच्या टप्प्यात पेमराज सारडा महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांनी धुरा सांभाळली. लहानपणापासूनच डॉ. सहस्रबुद्धे यांना पोहणे, झाडावर चढणे, डोंगरदर्‍यांतून भटकणे, देशपर्यटन, चित्रकला, मातीच्या मूर्ती करणे, नाट्याभिनय करणे, नृत्य, नृत्यनाट्य दिग्दर्शन, विशेषतः लोकनृत्य, वक्तृत्व, सामाजिक व सांस्कृतिक सेवा आणि कीर्तन ऐकणे याचा छंद आहे. तो त्यांनी विकसित केला. याचबरोबर लेखन हा त्यांचा ध्यास आणि श्वास आहे. त्यांनी लेखनछंदही विकसित केला. वाङ्मयाच्या सर्व प्रकारांमध्ये त्यांनी मोठ्या क्षमतेने लेखन केले. ‘राष्ट्र सेवा दल’ या संघटनेचे श्री. पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सैनिक व मुख्य शिक्षक म्हणून त्यांनी बालवयात इ. 4 थी ते 8 वीपर्यंत काम केले. राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकात पोवाडे गाणे, नाट्यछटा सादर करणे, छोट्या संवादात काम करणे अशा सहभागातून समाज व सांस्कृतिक प्रबोधनात सहभाग नोंदवला. याच काळात सर्वोदयाच्या संस्कार साधनेत त्यांनी प्रभातफेर्‍या काढणे, साष्टांग नमस्कार स्पर्धेत भाग यात सहभाग नोंदवला. इ. 8 वीच्या अखेरच्या परीक्षेनंतर त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कै. दामुअण्णा दाते यांच्या संपर्कात आले आणि संघाचे संघटनात्मक कार्य करू लागले. संघाचे ओटीसी प्रशिक्षण मे 1962 मध्ये प्रथम वर्ष स्वरूपात पूर्ण केले. संघाच्या नियोजित उपक्रमात त्यांनी शाखा मुख्य शिक्षक म्हणून कार्य केले. आणीबाणीच्या काळात त्यांनी स्वातंत्र्य चळवळीतील सहभागाप्रमाणे सहभाग नोंदवला. शिक्षक संघटनेत ते सक्रीय होते. या प्रवासात त्यांनी सत्याग्रह करून तुरुंगवासही पत्करला. अकोले तालुक्यातील कॉ. दत्ता देशमुख आणि नंतर बी. के. देशमुख यांच्या सहवासातून कम्युनिस्ट चळवळीशीही त्यांनी सहभाग नोंदवला. पू. हरिभाऊ फडके यांच्या सहवासात म. गांधी यांच्या विचारांचाही संस्कार त्यांच्यावर झाला. या सर्व प्रवासात त्यांच्या मनात राष्ट्रीय आणि वैश्विक मानवतेचे विचार विकसित झाले. त्याच जाणिवेने त्यांचे कार्य सुरू आहे. 1979 पासून त्यांनी ‘वनवासी कल्याण आश्रम’, ‘राष्ट्र सेवा मंडळ’, ‘शिक्षकी पेशा’ आणि अलिकडे ‘आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट’ या माध्यमातून त्यांचे सामाजिक व सांस्कृतिक कार्य सुरूच आहे. या सर्व कार्यात त्यांच्या पत्नी सौ. उषा सहस्रबुद्धे यांनी सर्व स्तरांवर मनःपूर्वक सक्रीय सहभाग नोंदविला.

आज संशोधनात्मक, वैचारिक, चिंतनात्मक, शास्त्रमंडनात्मक, ललित, स्फुट, संपादनात्मक आणि काव्य स्वरूपात त्यांचे विपुल लेखन प्रसिद्ध आहे व होत आहे. लेखन सातत्य हे त्यांचे वैशिष्ट्य होय. आता सत्तरीच्या उंबरठ्यावरही त्यांचे अविरत लेखन सुरू आहे. त्यांच्या सौभाग्यवती उषा सहस्रबुद्धे यांचेही सहकार्य सातत्याने टंकलेखन, पत्रव्यवहार, मुद्रित संशोधन इ. स्वरूपात सुरूच आहे. आता त्यांचे चिरंजीव वैद्य (डॉ) स्वप्निल अनिल सहस्रबुद्धे हे निष्णात वैद्य म्हणून सेवा करीत आहेत. त्यांच्या पत्नी वैद्य (डॉ) सोनिया याही त्यांच्यासमवेत सेवारत आहेत. दोघेही सामाजिक, सांस्कृतिक कार्यातही सक्रिय आहेत. त्यांची कन्या प्रा.सौ. स्फूर्ति कौस्तुभ देशपांडे (स्फूर्ति अनिल सहस्रबुद्धे) अध्यापनाबरोबर सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमात तर सहभागी आहेतच त्याचबरोबर त्या इंग्रजी भाषेतून संशोधन व साहित्य निर्मितीतही झपाट्याने पुढे जात आहेत. त्यांची दोन पुस्तके प्रसिद्ध आहेत तर त्यांचे पती श्री. कौस्तुभ पांडुरंग देशपांडे हे अकाऊंट आणि संगणक क्षेत्रात कार्यरत आहेत.

डॉ. सहस्रबुद्धे यांचे नातू कुमार प्रणव स्वप्निल सहस्रबुद्धे हेही संगीत, चित्र, शिल्प, नाट्य, क्रीडा या कलांचा छंद पारंपरिक शिक्षणाबरोबर जोपासत आहेत. तसेच त्यांची नात कुमारी श्रेया कौस्तुभ देशपांडे नृत्य, नाट्य, गायन, चित्र, शिल्प, क्रीडा यांचा पारंपरिक शिक्षणाबरोबर छंद जोपासत आहेत.

डॉ. सहस्रबुद्धे यांचे लोकविलक्षण वैशिष्ट्य म्हणजे त्यांना आलेले दिव्य अनुभव. महर्षी अगस्त्य यांनी त्यांना त्यांचे कार्य लिहून प्रसिद्ध करण्याची प्रत्यक्ष आज्ञा दिली. त्यांनी काय लिहायचे हेही सांगितले. महर्षी अगस्त्यांच्या आज्ञेनुसार ‘अगस्त्य महात्म्य’ ही उपासना पोथी लिहिली गेली. 937 ओव्यांची ही ओवीबद्ध पोथी, श्री अगस्त्य ऋषी आश्रम, अकोले येथे समर्पित केली असून, या पोथीचे साधक मोठ्या श्रद्धेने पारायण करून आपले मंतव्य अगस्त्यांच्या चरणी मांडून; त्यांच्या कृपेसाठी प्रार्थना करतात. या पोथीचे कन्नडमध्ये रूपांतर झाले आहे. ‘अगस्त्य’ ही कादंबरीही लिहिली असून कादंबरीचे इंग्रजी आणि कन्नडमध्ये रूपांतर झाले आहे.

“BOOKS ARE THE UNIQUELY PORTABLE MAGIC.”

“A great book should leave you with many experiences. You live several lives while reading.”